निमगाव वाघात सर्वच उमेदवार आले एका छताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:52 AM2021-01-13T04:52:28+5:302021-01-13T04:52:28+5:30

निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडाव्या म्हणून एकता फाउंडेशन ट्रस्टने सर्वच उमेदवारांना एका छताखाली एका व्यासपीठावर ग्रामस्थांसमोर आणण्याचे ...

In Nimgaon Wagah, all the candidates came under one roof | निमगाव वाघात सर्वच उमेदवार आले एका छताखाली

निमगाव वाघात सर्वच उमेदवार आले एका छताखाली

निवडणुका लोकशाही व निकोप पद्धतीने पार पाडाव्या म्हणून एकता फाउंडेशन ट्रस्टने सर्वच उमेदवारांना एका छताखाली एका व्यासपीठावर ग्रामस्थांसमोर आणण्याचे कार्य केले होते. राजकीय हेवेदावे व स्पर्धा बाजूला सारत नवनाथाच्या मंदिर सभागृहात सर्व उमेदवार एकत्र जमले होते. सर्व उमेदवारांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत गावाच्या विकासासाठी कार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार एकनाथ जाधव, किरण जाधव, भाऊसाहेब जाधव, मनोजकुमार फलके, संदीप फलके, उज्ज्वला कापसे, सविता कापसे, सुजाता कापसे, लक्ष्मी जाधव, नाना डोंगरे, राजेंद्र डोंगरे, जमीर शेख, प्रतिभा गजरे, रूपाली जाधव, संगीता डोंगरे, यमुना चौरे, लता फलके, विजय केदार, दीपक गायकवाड, अश्‍विनी कदम, संगीता आतकर, छबाबाई पुंड, मुन्नाबी शेख, भास्कर उधार, अर्जुन काळे, प्रमोद जाधव, संदेश शिंदे, संजय कापसे, सुमन डोंगरे, अन्सार शेख, अलका गायकवाड, मनीषा गायकवाड, विद्या गायकवाड यांचा एकता फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत पाटील फलके, संजय फलके, गोकूळ नाना जाधव, अरुण अंधारे, रामदास पवार, किरण जाधव, सागर फलके, राहुल फलके, महेश फलके, अक्षय ठाणगे, रितेश डोंगरे, हुसेन शेख, सुधीर खळदकर, विकास जाधव, रवींद्र जाधव, शिरीष फलके, सोमनाथ फलके, पंकज वाबळे व एकता फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रामदास अडसुरे यांनी केले. आभार संतोष फलके यांनी मानले.

...

गावाच्या निवडणुकीत गटतटाच्या राजकारणात वादाच्या ठिणग्या पडून एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होत असतात. निवडणुकीचे भांडणे वर्षानुवर्षे चालतात. हे वाद विकोपाला जाऊन गावाची शांतता भंग होते. गुण्या-गोविंदाने राहणा-या गावात या निवडणुकीपायी भांडणे होऊ नये, वाद विकोपाला न जाता ही लोकशाही प्रक्रिया निकोपपणे पार पाडण्यासाठी हा उपक्रम घेतला आहे.

- अतुल फलके, एकता फाउंडेशन, अध्यक्ष.

..

फोटो-१२निमगाव वाघा

..

Web Title: In Nimgaon Wagah, all the candidates came under one roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.