पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निमोणकर, कार्याध्यक्षपदी थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:22 AM2021-09-27T04:22:38+5:302021-09-27T04:22:38+5:30

जामखेड : जामखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नासीर पठाण, उपाध्यक्षपदी ‘लोकमत’चे अशोक निमोणकर, सचिवपदी मिठुलाल नवलाखा, कार्याध्यक्षपदी ‘लोकमत’चे ...

Nimonkar as the Vice President of the Press Association, Thorat as the Working President | पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निमोणकर, कार्याध्यक्षपदी थोरात

पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निमोणकर, कार्याध्यक्षपदी थोरात

जामखेड : जामखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नासीर पठाण, उपाध्यक्षपदी ‘लोकमत’चे अशोक निमोणकर, सचिवपदी मिठुलाल नवलाखा, कार्याध्यक्षपदी ‘लोकमत’चे संतोष थोरात यांची निवड करण्यात आली.

सहसचिवपदी अविनाश बोधले, खजिनदारपदी सुदाम वराट, जिल्हा पत्रकार संघाच्या सहचिटणीसपदी यासीन शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पत्रकार पोपट गायकवाड, सुनील कोठारी, संतोष फिरोदिया, शहर बँकेचे संचालक संजय घुले, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश उगले, आदी उपस्थित होते.

धनराज पवार यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणीवर मोहिद्दीन तांबोळी, समीर शेख, दत्तराज पवार, किशोर दुशी, सत्तार शेख, नंदूसिंग परदेशी, राजेंद्र म्हेत्रे, पोपटराव गायकवाड, सुनील कोठारी यांच्या निवडी करण्यात आल्या. कायदेविषयक सल्लागारपदी ॲड. हर्षल डोके, अमोल जगताप यांची निवड करण्यात आली. पत्रकार गुलाब जांभळे, अनिल धोत्रे, बाळासाहेब शिंदे, गणेश जव्हेरी, बाळासाहेब वराट, अशोक वीर, आदी उपस्थित होते.

---

चार पासपोर्ट फोटो

२६ नासीर पठाण, अशोक निमोणकर, संतोष थोरात, मिठुलाल नवलाखा

Web Title: Nimonkar as the Vice President of the Press Association, Thorat as the Working President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.