दुर्दैवी! विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:34 PM2019-02-09T12:34:55+5:302019-02-09T12:46:48+5:30
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
आश्वी - संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचामृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे.
वाबळे वस्तीवरील नानासाहेब ठकाजी वर्पे यांच्या मालकीच्या गायींचा गोठ्यावर शनिवारी (9 फेब्रुवारी) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कनोली वाहिनीवरील ११ केव्ही विद्युत वाहिनीची तार तुटुन गोठ्यावर पडली या वेळी गोठ्यात बांधलेल्या नऊ गायींचा मृत्यू झाला.
सुदैवाने वर्पे कुटुंबीय गोठ्यात जाण्यापूर्वी दुर्घटना लक्षात आल्याने ते गोठ्यात गेले घटनेची माहिती पोलीस पाटील नानासाहेब वर्पे यांनी महावितरण कंपनीच्या योगेश सोनवणे यांना कळविली. सोनवणे यांनी तातडीने घटनास्थळीधाव घेऊन वीज प्रवाह खंडीत केला.
या घटनेत नानासाहेब वर्पे यांच्या नऊ गायींचा मृत्यू झाल्याने सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले असून परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.