भेंड्यासह परिसरात शनिवारपासून नऊ दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:53+5:302021-05-23T04:19:53+5:30

भेंडा : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाण्यासह परिसरात शनिवार (दि. २२) ते रविवार (दि. ...

Nine days public curfew from Saturday in the area with sheep | भेंड्यासह परिसरात शनिवारपासून नऊ दिवस जनता कर्फ्यू

भेंड्यासह परिसरात शनिवारपासून नऊ दिवस जनता कर्फ्यू

भेंडा : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता नेवासा तालुक्यातील भेंडा, कुकाण्यासह परिसरात शनिवार (दि. २२) ते रविवार (दि. ३०) पर्यंत जनता कर्फ्यू लागू केला आहे.

कुकणा व भेंडा येथे आसपासच्या १५ ते २० गावांचे दैनंदिन व्यवहार चालतात. लाॅकडाऊन असतानाही येथील बाजारपेठेत चांगलीच वर्दळ असते. पोलिसांनी दोन्हीही गावांत सलग २-३ दिवस दंडात्मक कारवाई करूनही गर्दी कमी होत नसल्याने कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी अखेर जनता कर्फ्यूचा निर्णय प्रशासन व स्थानिक ग्राम समितीने घेतला केला आहे.

भेंडा, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी, देवगाव, तेलकुडगाव, जेऊर हैबतीसह इतर गावांनी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ६ ते ९ याच वेळेत दूध उत्पादकांचे दूध संकलन होईल. पिठाच्या गिरणी नियमानुसार चालतील. मटण, मासे, अंडी विक्रेत्यांनी सामाजिक प्रसार माध्यमाचा वापर करूनच घरपोहोच सेवा द्यावी. फक्त औषधाचे दुकान व दवाखानेच चालू राहतील. बाकी सर्व दुकाने व व्यवहार पूर्णपणे बंद राहतील. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर प्रथम १ हजार व दुसऱ्यांदा ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणारे व गर्दी करणारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भेंडा बुद्रूकच्या सरपंच वैशाली शिंदे यांनी केले आहे.

Web Title: Nine days public curfew from Saturday in the area with sheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.