नितीन आगे खून खटला सुप्रीम कोर्टात लढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:05 AM2017-11-29T05:05:31+5:302017-11-29T05:05:44+5:30
खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे
अहमदनगर : खर्डा (ता़ जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने याबाबतची वस्तुस्थिती समजून घेऊन हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात लढविण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी सांगितले़
थूल यांनी मंगळवारी खर्डा येथे नितीनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चर्चा केली़ थूल म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे या प्रकरणाची वस्तुस्थिती समजावून घ्यावयाची आहे़ या खटल्यात जिल्हा न्यायालयात काय त्रुटी राहिल्या, शासनाला अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात कशा पद्धतीने मदत करता येईल याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे़ तसेच हा खटला वरिष्ठ न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमून पुढील कार्यवारी करण्यात येईल़ वेळ पडली तर हा खटला उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयातही लढण्याचीही शासनाची तयारी असल्याचे थूल म्हणाले़