कांबीच्या सरपंचपदी नितीश पारनेरे, उपसरपंचपदी सुनील राजपूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:19 AM2021-02-12T04:19:18+5:302021-02-12T04:19:18+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील संसद आदर्शगाव कांबीच्या सरपंचपदी बहुमताने नितीश बप्पासाहेब पारनेरे यांची, तर उपसरपंचपदी सुनील इंदरसिंग राजपूत यांची ...
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील संसद आदर्शगाव कांबीच्या सरपंचपदी बहुमताने नितीश बप्पासाहेब पारनेरे यांची, तर उपसरपंचपदी सुनील इंदरसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड झाली.
कांबी येथील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी नितीश पारनेरे व आसाराम कर्डिले या दोघांचे उमेदवारी अर्ज राहिल्याने मतदान घेण्यात आले. यामध्ये नितीश पारनेरे यांना ८, तर आसाराम कर्डिले यांना १ मत मिळाले. एकूण ११ सदस्यांपैकी ८ सदस्यांनी मतदान केले, तर २ सदस्य तटस्थ राहिले. उपसरपंचपदासाठी सुनील राजपूत यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य बाबासाहेब सोनाजी मगर, कांताबाई अंबादास म्हस्के, शोभा सुरेश म्हस्के, कविता बाळासाहेब म्हस्के, मीनाक्षी दत्ता थोरात, पीरमहंमद शेख, अनिता चोरमले आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील निवडणुकीत माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले व माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली विश्वासनंद ग्रामविकास पॅनलने ११ पैकी ९ जागांवर, तर केदारेश्वरचे संचालक सुरेशचंद्र होळकर व माजी सरपंच अशोकनाना म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली विश्वासगिरी ग्रामविकास पॅनलने २ जागांवर विजय मिळवला होता.
फोटो ओळी ११ कांबी
कांबीचे नवे सरपंच नितीश पारनेरे व उपसरपंच सुनील राजपूत.