निवृत्तीनाथ दिंडी श्रीरामपुरात
By Admin | Published: June 29, 2016 12:43 AM2016-06-29T00:43:14+5:302016-06-29T00:56:03+5:30
श्रीरामपूर : विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळमृदुंगाच्या गजरात निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी श्रीरामपूरात भव्य स्वागत झाले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
श्रीरामपूर : विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळमृदुंगाच्या गजरात निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी श्रीरामपूरात भव्य स्वागत झाले. हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.
पालखीतील वारकऱ्यांना नाश्ता , तसेच खाद्यपाकिटे देण्यात आली. विश्व हिंंदू परिषद, लायन्स क्लब व ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने वारकऱ्यांची मोफत तपासणी करुन औषधेही देण्यात आली. नगरपालिकेने पाण्याची व्यवस्था केली.
माजी आमदार जयंत ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपाध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, पक्षप्रतोद संजय फंड, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, राष्ट्रवादीचे सिध्दार्थ मुरकुटे, बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब पवार, उपाध्यक्ष सचिन गुजर, पत्रकार रमेश कोठारी आदींनी स्वागत केले.
निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्वस्त पुंडलीक थेटे, ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, जयंत महाराज गोसावी, सुरेश गोसावी आदी दिंडी प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. राजश्री ससाणे यांनी पालखीची पूजा केली. तरुणांनी पालखी रथातून खांद्यावर घेऊन मिरवणूकीने मेनरोडमार्गे श्रीराम मंदिरात आली. मंदिर ट्रस्टचे मधुकर झिरंगे, उपाध्ये परिवारातर्फे अशोक उपाध्ये, गौतम उपाध्ये, तसेच बाजार समिती, व्यापारी व हमाल मापाडी संघटना यांच्यावतीने पालखीची पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी बेलापूरकडे रवाना झाली. (वार्ताहर)