नगरमधून उमेदवारी करण्याची ईच्छा नाही; पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका

By अरुण वाघमोडे | Published: June 16, 2024 06:16 PM2024-06-16T18:16:23+5:302024-06-16T18:18:18+5:30

छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले.

no desire to candidate from nagar said pankaja munde | नगरमधून उमेदवारी करण्याची ईच्छा नाही; पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका

नगरमधून उमेदवारी करण्याची ईच्छा नाही; पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका

अरुण वाघमोडे. अहमदनगर: मी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाचे येथील शहर जिल्हाध्यक्षांनी केली आहे. त्यांचे मी आभार मानते मात्र, यावर माझे कोणतेही मत नसून तशी माझी ईच्छा नाही. अशी भूमिका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली.
मुंडे या रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुखदेव पवार,सोनू भुजबळ, अमोल सुरसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दीपक दहिफळे, नितीन शेलार, कैलास गर्जे, बंटी ढापसे, सरपंच अमित आव्हाड, सार्थक आंधळे, सरपंच बापू आव्हाड, वैभव झोटिंग अतुल गीते, सतीश ढाकणे, संकेत डोळे, सतीश घोडके, किशोर बडे, सौरभ सानप, विजय भालेकर, ज्ञानेश्वर आव्हाड,सुजल आंधळे, रविराज आव्हाड, युवराज शिरसाठ आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे या प्रथमच शहरात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत आपला पराभाव झाला असला तरी तुम्हीच आमच्या नेत्या आहात. अशी भावना याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुंडे म्हणाल्या पराभवाने खचून जाऊ नका. कार्यकर्त्यांनी भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: no desire to candidate from nagar said pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.