ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:12+5:302021-09-16T04:27:12+5:30

ओबीसी आरक्षणाबाबत महायुती शासनाचा निषेध करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावे असलेल्या निवेदनाची प्रत तहसीलदार योगेश चंद्रे यांना बुधवारी ...

No elections without OBC reservation | ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको

ओबीसी आरक्षणाबाबत महायुती शासनाचा निषेध करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावे असलेल्या निवेदनाची प्रत तहसीलदार योगेश चंद्रे यांना बुधवारी (दि. १५) देण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

रोहोम म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण हा त्यांचा न्याय हक्क असून, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी हे आरक्षण राहावे, म्हणून वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे. राज्यातील महायुती शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा झाला. मागासवर्ग आयोग नेमूनही त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ओबीसी आरक्षण प्रलंबित असताना या निवडणुका घेणे म्हणजे ओबीसी समाज बांधवांवर अन्याय आहे, हा अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात यावी.

याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक राऊत, शहराध्यक्ष दत्ता काले, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, जगदीश मोरे, नगरसेवक शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, विवेक सोनवणे, संतोष नेरे व चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

............

फोटोओळी -

भाजपच्यावतीने बुधवारी तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले.

..........

फोटो१५ - भाजप निवेदन - कोपरगाव

Web Title: No elections without OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.