कितीही विरोध करा, कामे करणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:56 AM2021-02-20T04:56:53+5:302021-02-20T04:56:53+5:30

कोपरगाव : शहरातील नागरिकांच्या हिताचे असलेल्या २८ रस्त्यांची कामे तीनवेळा मंजुरीसाठी ठेवूनही भाजप- शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी त्याचे श्रेय ...

No matter how much you protest, it will work | कितीही विरोध करा, कामे करणारच

कितीही विरोध करा, कामे करणारच

कोपरगाव : शहरातील नागरिकांच्या हिताचे असलेल्या २८ रस्त्यांची कामे तीनवेळा मंजुरीसाठी ठेवूनही भाजप- शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी त्याचे श्रेय मला जाईल, या भीतीने ती नामंजूर केली. परंतु, हा विषय शहराच्या नागरिकांच्या हिताचा असल्याने तुम्ही कितीही विरोध करा, या २८ रस्त्यांच्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी आणून ती कामे करणारच असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप - शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी २८ रस्त्यांची कामे नामंजूर केली होती. त्यावर बुधवारी (दि.१७) भाजप - शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. मात्र, या विषयवार गुरुवारी (दि.१८) नगराध्यक्ष वहाडणे यांनी त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली.

वहाडणे म्हणाले, तुमचे नगराध्यक्ष असतानाच धारणगाव रोडचे १ कोटी ४ लाखांचे अंदाजपत्रक तयार झाले. त्याची तांत्रिक मंजुरीही एम. जी. पी. कडूनच आणली. तरीही आज एम. जी. पी व आमच्या नावाने आरडाओरड सुरू आहे. त्या कामाचे अंदाजपत्रक १ कोटी होते, तरी प्रत्यक्षात फक्त ६५ लाख रुपयेच बिल अदा करण्यात आलेले आहे. अंदाजपत्रक कितीही रकमेचे असले, तरी प्रत्यक्ष कामाचे मोजमाप होऊनच बिल दिले जाते. अंदाजपत्रक म्हणजे पेमेंट नव्हे. तसेच एक माजी नगराध्यक्ष म्हणतात की, ४७० खोका शॉप होऊ शकतील अशी योजना तयार आहे, पण वहाडणे हे काहीच करत नाहीत. जर खोका शॉपची योजना तयार होती, तर तुम्ही सत्तेत असताना का केले नाही ?

.......

"त्यांची"नावे लवकरच जाहीर करणार...

कोपरगाव नगर परिषद संदर्भातील क्रीडांगणाचे आरक्षण, भ्रष्टाचार, ठेकेदार - नगरसेवक संबंध तसेच काही महान नगरसेवकांचे पराक्रम नावासह जनतेसमोर मांडणार आहे. कारण नावे घेऊन बोला असे कोल्हे गटाचेच म्हणणे आहे. तसेच त्यांचेच काही नगरसेवक खासगीत माझ्याकडे काय बोलतात, त्यांची देखील नावे जाहीर करणार आहे, असेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यावेळी सांगितले.

--

Web Title: No matter how much you protest, it will work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.