माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही-रोहित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:59 PM2020-01-17T12:59:30+5:302020-01-17T13:00:27+5:30
मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मी नगर जिल्ह्यातील आमदार आहे. त्यामुळे माझे सर्वांवर प्रेम आहे. त्यामुळे संगमनेर की प्रवरानगर जास्त प्रेम याचा प्रश्नच नाही. मी कर्जत-जामखेडला असे विकासाचे मॉडेल निर्माण करील की, भविष्यात माझ्यावर घराणेशाहीचा कोणी आरोप करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार रोहित पवार बोलत होते.
कर्जत-जामखडेमध्ये तीस वर्षापासून विकास नव्हता. तेथे विकासाची संधी होती. कर्जत-जामखेडला मी विकासाचे मॉडेल तयार करायचे ठरविले आहे. तेथे मॉडेल निर्माण करण्याची संधी आहे. कर्जत-जामखेडचे लोक माझ्यावर प्रेम करीत होते. जनता पाठिशी होती ती राहिली. त्यामुळे माझा विजय झाला. माझ्या आयुष्यात घराणेशाहीचा कोणी विचार करु नये. मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आईचाही माझ्या यशात मोठा वाटा आहे. कारण आईने माझ्यावर सेवेची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ती जबाबदारी मला पार पाडायची आहे.
राष्टवादीचे नेते शरद पवार यांच्याविषयी बोलायचे तर ते किती वाटले ते रिटायर होतील, असे अनेकांना वाटले. पण त्यांनी अनेकांदा दाखवून दिले की, हार माणायची नाही. शेवटपर्यंत सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून काम करायचे. प्रामाणिकपणे काम केले आणि लोकांची ताकद मिळाली तर त्यांना कोणी हरवू शकत नाही. त्यामुळे ते आमचे आदर्श आहेत, असेही पवार यांनी सांगितले.