पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 06:31 PM2019-04-04T18:31:24+5:302019-04-04T18:33:00+5:30

भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

 No water, no vote : boycott of voters in Shrirampur | पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

श्रीरामपूर : भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला. श्रीरामपूर येथील उंबरगाव, माळेवाडी, वळदगावसह काही गावांनी ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
धरणातून १५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरच्या आवर्तनातून उसासह चारा पिकांना जीवनदान मिळणार होते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंदिरगाव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, वडाळा महादेव, उंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाही. राहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिला. त्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकºयांनी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेरावो घातल. यानंतर संतापलेल्या शेतकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला. जमावबंदी आदेश लागू झालेले असल्याने यावेळी पोलिसांचू कूमक बोलविण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले, अनिल औताडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विश्वनाथ मुठे, दिलीप गलांडे, नानासाहेब पवार, सुनील कुदळे, रघुनाथ उघडे, सोपान औताडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळालीप्रवरा येथील आंदोलनात सहभाग घेतला.
आता भंडारदरा धरणात एक हजार ६०० व निळवंडेत १ हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातील ४५० एमसीएफटी हा मृतसाठा आहे. २ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत. प्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
आज सायंकाळी माळेवाडी, उंबरगाव, उंदिरगाव, मुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहे. नेते मंडळी व उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे, जितेंद्र भोसले, अनिल औताडे, विश्वनाथ मुठे, राजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.

Web Title:  No water, no vote : boycott of voters in Shrirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.