मनपा निवडणूक २०१८ : केडगावात प्रथमच काँग्रेसचा कोतकरांशी मुकाबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:01 PM2018-11-27T16:01:03+5:302018-11-27T16:01:07+5:30

कोतकर समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केडगावमधून काँग्रेस मैदान सोडेल असा अंदाज बांधला जात असतानाच डॉ़ सुजय विखे यांनी केडगावमध्ये लक्ष घालत दल बदलणाऱ्या भाजप उमेदवाराविरोधात आव्हान उभे केले.

Nomination Election 2018: First time in Kedganga to fight against Congress workers | मनपा निवडणूक २०१८ : केडगावात प्रथमच काँग्रेसचा कोतकरांशी मुकाबला

मनपा निवडणूक २०१८ : केडगावात प्रथमच काँग्रेसचा कोतकरांशी मुकाबला

केडगाव : कोतकर समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केडगावमधून काँग्रेस मैदान सोडेल असा अंदाज बांधला जात असतानाच डॉ़ सुजय विखे यांनी केडगावमध्ये लक्ष घालत दल बदलणाऱ्या भाजप उमेदवाराविरोधात आव्हान उभे केले. यामुळे राजकीय इतिहासात प्रथमच कोतकर विरुध्द काँग्रेस असा सामना रंगणार आहे.भाजपला आता शिवसेना आणि काँग्रेस या दोघांशीही दोन हात करावे लागणार आहेत. मनसेला केडगावमध्ये फक्त एकच उमेदवार मिळाला आह़े
महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. केडगावमधील कोतकर समर्थक उमेदवार भाजपकडून रिंगणात उतरल्याने ऐनवेळी काँग्रेसमध्ये आलेल्यांना विखे यांनी उमेदवारी दिली. आठही जागांवर उमेदवार दिले मात्र एकाचा एबी फॉर्म नाकारण्यात आल्याने ८ जागेवर ७ उमेदवार रिंगणात राहिले. यातील बहुतेक कोतकर समर्थक असल्याने त्यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढत असल्याची चर्चा होती. काँग्रेस उमेदवारांनी माघार घेऊ नये व त्याच्यांवर कोणाचा दबाव येऊ नये याची काळजी घेत विखे यांनी या सातही उमेदवारांना शिर्डी येथे दोन दिवसापासून आपल्या यंत्रणेत ठेवले. त्यामुळे रविवार पासून हे सर्व उमेदवार स्वीच आॅफ झाले. सोमवारी काँग्रेसमधील कोणी माघार घेईल का? याचीच सर्वांना उत्सुकता
होती. मात्र काही अपक्ष उमेदवार सोडले तर कोणीच मैदान सोडले
नाही.
केडगावमधील प्रभाग १६ व १७ मध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. सोमवारी निवडणुकीतून २५ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. आता ८ जागांसाठी केडगावमधील दोन प्रभागात ३७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १६ मध्ये १८ तर प्रभाग १७ मध्ये १९ उमेदवार मैदानात आहेत. सर्वाधिक ७ उमेदवार १६ (क) व १७ (अ) मध्ये आहेत़ उर्वरित ठिकाणी ३ ते ४ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या काही कोतकर समर्थक व भाजप व सेनेच्या निष्ठावंतांनी आपले अर्ज मागे घेतले़ तर भाजपने उमेदवारी नाकारलेले प्रतीक बारसे व आशा विधाते यांचे अपक्ष अर्ज मात्र राहिले आहेत.
काँग्रेसच्या नगरसेविका सविता कराळे यांच्यासह धनंजय जामगावकर, श्रीकांत चेमटे, संभाजी सातपुते. महेश गुंड, आश्विनी गुंड, राजकुमारकांबळे, अभिजित कोतकर, मिलिंद भालसिंग, शरद ठुबे या प्रमुख अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे
घेतले.
यांनी केली बंडखोरी
मुकेश गावडे ( सेना),आशा विधाते (भाजप),दिनेश निकाळजे (भाजप), शिवाजी लोंढे ( भाजप),प्रतीक बारसे (भाजप) या अपक्षांनी उमेदवारी नाकारल्याने आपले अर्ज कायम ठेवले आहे.

Web Title: Nomination Election 2018: First time in Kedganga to fight against Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.