एक रुपयाही कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:09+5:302021-05-24T04:20:09+5:30

निळवंडे धरणाच्या कालव्याची पाहणी करण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी राहुरी तालुक्यातील कानडगाव शिवारातील कालव्याची पाहणी केली. कामाला गती ...

Not a single rupee will fall short | एक रुपयाही कमी पडू देणार नाही

एक रुपयाही कमी पडू देणार नाही

निळवंडे धरणाच्या कालव्याची पाहणी करण्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी राहुरी तालुक्यातील कानडगाव शिवारातील कालव्याची पाहणी केली. कामाला गती येण्यासाठी अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना त्यांनी केल्या.

याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.

भागडा चारी देखभाल-दुरुस्तीसाठी एक कोटी ५० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली असता हा प्रस्ताव औरंगाबाद येथील गोदावरी खोरे विकास महामंडळात प्रलंबित असून, संबंधित अधिकाऱ्यांना नामदार जयंत पाटील यांनी प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रालयात पाठवा, तातडीने निधी मंजूर करून देण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जिल्हा राष्ट्रवादी युवा काँग्रेस अध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संतोष आघाव, अमोल जाधव, अभिषेक भगत, नंदकुमार गागरे, बापूसाहेब गागरे, राजू सिनारे, संदीप गागरे, अनिल शिरसाठ, रवींद्र गागरे, विनोद मुसमाडे, तुकाराम गागरे, मंगेश गाडे, जालिंदर मुसमाडे, सागर मुसमाडे, पांडुरंग गाडे, सुधाकर गावडे उपस्थित होते.

फोटो -२३ जयंत पाटील

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कानडगाव येथे जाऊन कालव्याची पाहणी केली.

Web Title: Not a single rupee will fall short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.