नोटाला दाखविला ठेंगा!

By Admin | Published: May 17, 2014 12:42 AM2014-05-17T00:42:27+5:302024-03-18T16:01:44+5:30

अहमदनगर : अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी नोटाला (नकारार्थी मतदान) ठेंगा दाखवला आहे.

Nota will be shown! | नोटाला दाखविला ठेंगा!

नोटाला दाखविला ठेंगा!

अहमदनगर : अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी नोटाला (नकारार्थी मतदान) ठेंगा दाखवला आहे. नगरमध्ये अवघ्या ०.७ (७ हजार ४७३) तर शिर्डीत १.५ टक्के (९ हजार ८७९) मतदारांनी नोटाला पसंती दाखवली. पसंतीचा उमेदवार नसेल तर नोटा हे स्पेशल बटण दाबण्याची मतदानयंत्रात सोय होती. लोकसभेच्या निवडणुकीसाठी यावर्षी प्रथमच आयोगाने हा प्रयोग केला होता. नोटा दाबणार्‍या मतदारांची आकडेवारी पाहिली तर ही टक्केवारी अत्यल्प आहे. शेवगावमधील सर्वाधिक १ हजार ५५२ मतदारांनी उमेदवारांना नापसंती दाखवली. पोस्टल मतदान करणार्‍या ५जणांनीही पक्षांनी दिलेले उमेदवार नाकारले. शिर्डीत पोस्टाद्वारे मतदान करणार्‍या ५ जणांनी नोटा दाबला. सर्वाधिक अकोल्यात २३२८ जणांनी तर सर्वात कमी नेवाशातील मतदारांनी ११९३ उमेदवार नाकारले. मतदारसंघनिहाय नोटा दाबणार्‍यांची आकडेवारी (नगर) : शेवगाव - १५५२, राहुरी - १२६६, पारनेर - १२६५, नगर - ११६२, श्रीगोंदा - १०१८, कर्जत-जामखेड - १२०५. (एकूण ७ हजार ४६८). शिर्डी : अकोले - २३२८, संगमनेर - १७१५, शिर्डी - १७५९, कोपरगाव - १४२२, श्रीरामपूर -१४५६, नेवासा -११९३. (प्रतिनिधी) ७१० मते बाद ४मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे वापरण्यात येत असल्याने मते बाद होत नाहीत. मात्र, या लोकसभा निवडणुकीत ७१० मते बाद झाली. ती सर्व पोस्टाद्वारे मतदान करणार्‍यांची आहेत. शिर्डीत २४८ तर नगरमध्ये ४६२जणांची मते बाद ठरविण्यात आली.

Web Title: Nota will be shown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.