पक्षांतराबाबत आघाडीत काहीच ठरलेले नाही - मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:23 AM2020-07-10T06:23:20+5:302020-07-10T06:26:25+5:30
संगमनेर नगरपरिषदेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. सप्टेंबरपर्यंत कोरोना रूग्ण संख्या कमी होऊन नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल
संगमनेर (जि़ अहमदनगर) : शिवसेना, राष्टÑवादी व कॉँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकारची समन्वय समिती स्थापन केली आहे. मात्र, आपल्या तीन पक्षातील लोकं आपल्या-आपल्यातच पक्षांतर करत असतील तर काय करावे, याचा काहीही विचार झालेला नाही़ भाजपला रोखायचे असेल तर यावर मार्ग काढावा लागेल, असे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. संगमनेर नगरपरिषदेच्या सभागृहात मुश्रीफ यांनी गुरूवारी आढावा बैठक घेतली. सप्टेंबरपर्यंत कोरोना रूग्ण संख्या कमी होऊन नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरपंचांना मुदतवाढ नाहीच
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता डिसेंबरपर्यंत घेणे शक्य नाही़ तसेच मुदतवाढही देता येणार नाही़ याबाबत सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिले आहेत. खासदार-आमदारांना जशी मुदतवाढ देता येत नाही, तशीच मुदतवाढ सरपंचांना देता येणार नाही़ त्यामुळे प्रशासक नेमण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.