जामखेडमधील तीन खासगी कोविड सेंटरला भरारी पथकाच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:35 AM2020-10-03T11:35:03+5:302020-10-03T11:35:53+5:30
जामखेड महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेले एक हॉस्पिटल व इतर दोन खासगी हॉस्पिटल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून घेऊन उपचार करीत आहेत. कोवीड रूग्णांच्या तक्रारीवरुन भरारी पथकाने या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
जामखेड : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेले एक हॉस्पिटल व इतर दोन खासगी हॉस्पिटल शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम रुग्णांकडून घेऊन उपचार करीत आहेत. कोवीड रूग्णांच्या तक्रारीवरुन भरारी पथकाने या रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
या रुग्णालयात कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करताना जामखेड शहर व तालुक्यातील कोवीड रूग्णांना या हॉस्पिटलने लाखो रुपये ज्यादा उकळले आहेत. याबाबतच्या तोंडी व लेखी तक्रारी रूग्णांच्या नातेवाईकांनी, राजकीय पक्ष व विविध संघटनांनी भरारी पथकाकडे केल्या आहेत. सदर हॉस्पिटलची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भरारी पथकाचे प्रमुख परशुराम कोकणी यांनी पाहणी करून खातरजमा केली आहे. यामुळे सदर रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत.