अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 08:47 PM2021-05-13T20:47:06+5:302021-05-13T20:49:41+5:30

वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रांसह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे.

Notice to nine laboratories including Ahmednagar District Hospital |  अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा

 अहमदनगर जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयाेगशाळांना नोटिसा

अहमदनगर : वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रांसह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे.

कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रात चाचणी केली जाते. तसेच जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रात स्वॅब घेतले जात असून, याशिवाय आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात किती व्यक्तींचे स्वॅब घेतले, याची माहिती प्रशासनाला नियमित मिळते. परंतु, जिल्हा रुग्णालयासह खासगी प्रयोगशाळांकडून दररोज स्वॅब घेतले जातात, त्यापैकी किती जणांचे अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आले, याची माहिती महापालिकेला दिली जात नाही. ही आकडेवारी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी पाठपुरवा केला गेला. परंतु, प्रयोगशाळांनी माहिती सादर केली नाही. त्यामुळे नगर शहरातील पॉझिटिव्ह रेट नेमका किती आहे, याची माहिती उपलब्ध होत नव्हती. महापालिका आयुक्तांनी शहरातील डॉक्टर व प्रयोगशाळा चालकांची बैठक घेऊन याबाबत वेळोवेळी सूचनाही केल्या होत्या. मात्र खासगी प्रयोगशाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा रुग्णालयासह शहरातील नऊ खासगी प्रयोग शाळांना नियमित माहिती न मिळाल्यास परवाना निलंबित करण्यात येईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत.

या प्रयोगशाळांवर होणार कारवाई

जिल्हा रुग्णालय, मोलेक्युलर, एजीडी, मेट्रो, सहयोग, हेल केअर, कृष्णा, सुयोग.

नगर शहरातील रुग्णसंख्या कामी होताना दिसत आहे. रुग्णांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दररोज किती स्वॅब घेतले जातात. याची माहिती प्रयोगशाळांकडून येणे अपेक्षित होते. वेळावेळी सूचना करूनही माहिती दिली जात नसल्याने नऊ प्रयोगशाळांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

- शंकर गोरे, आयुक्त, महापालिका

Web Title: Notice to nine laboratories including Ahmednagar District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.