सावेडी दूध संघाच्या जागा विक्रीप्रकरणी नोटिसा : जागेची बेकायदेशीर विक्री प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:33 PM2018-07-31T12:33:48+5:302018-07-31T12:33:53+5:30

पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आताच्या सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडी येथील जागेच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी निविदेतील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बुºहाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी याचिका दाखल केली होती.

Notification on sale of Savdei Milk Union: Illegal sale case for land | सावेडी दूध संघाच्या जागा विक्रीप्रकरणी नोटिसा : जागेची बेकायदेशीर विक्री प्रकरण

सावेडी दूध संघाच्या जागा विक्रीप्रकरणी नोटिसा : जागेची बेकायदेशीर विक्री प्रकरण

केडगाव : पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आताच्या सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडी येथील जागेच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी निविदेतील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बुºहाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान औरंगाबाद खंडपीठाने दुग्ध विकास विभागाचे सचिव, सहनिबंधक व जागेचे खरेदीदार साई मिडास यांना १३ आॅगस्टला म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा काढल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत कर्डिले म्हणाले, नगर जिल्हा दूध संघ व त्यानंतर नगर, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव या सात तालुका संघाच्या मालकीची सावेडी येथील ८९ गुंठे जागेची २७ कोटी ११ लाख रुपयांना बोली लावत साई मिडास रियालिटिजने खरेदीची तयारी दाखविली आहे. २२ जानेवारी २०१८ प्रसिद्ध झालेल्या निविदेत या जागेच्या बाजारमूल्यांकनाची रक्कम दिली नाही. त्यामुळे अनेक इच्छुक खरेदीदारांना निविदा भरता आल्या नाहीत. शेवटच्या टप्प्यात व्यंकटेश डेव्हलपर्स २४ कोटी ३ लाख, संत नागेबाबा मल्टिस्टेट २२ कोटी २२ लाख २२ हजार ा्रुपये व साई मिडास २४ कोटी ११ लाख रुपयांच्या निविदा दाखल केल्या. दूध संघाच्या प्रतिनिधींनी खरेदीदारांसमवेत जास्तीत जास्त रक्कम मिळावी, यासाठी चर्चेच्या फेऱ्या केल्या. त्यानुसार दुसºया तौलनिक तक्त्यात व्यंकटेश डेव्हलपर्सने २७ कोटी, साई मिडासने २४ कोटी ११ लाख ११ हजार व नागेबाबा मल्टिस्टेटने २२ कोटी ७५ लाख रुपयांची बोली लावली. तिसºयावेळी व्यंकटेश डेव्हलपर्सने २७ कोटींची बोली कायम ठेवली. तर साई मिडासने २५ कोटी ११ लाख रुपयांची बोली लावली. त्यानंतर दूध संघाच्या प्रतिनिधींनी अंतिम बोली असल्याचे सांगत साई मिडासने २७ कोटी ११ लाख रुपयांची बोली लावली. त्यावेळी व्यंकटेश डेव्हलपर्सने २७ कोटी बोली कायम ठेवल्याचे दूध संघाच्या इतिवृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र २७ कोटी ११ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची शक्यता असतानाही दूध संघाच्या प्रतिनिधींनी इतर निविदाधारकांना डावलल्याचा आरोप कर्डिले यांनी केला आहे.
औरंगाबादच्या युनायटेड जनसेट फर्मने ३० कोटी रुपयांना ही जागा खरेदीची तयारी असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केल्याची माहितीही कर्डिले यांनी दिली. बाणेश्वर दूध संस्थेच्या वतीने अ‍ॅड. नितीन गवारे, अ‍ॅड. संजय गायकवाड यांनी न्यायालयात बाजू मांडली.

Web Title: Notification on sale of Savdei Milk Union: Illegal sale case for land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.