नगर जिल्ह्यात आता २० जूननंतर पाऊस - डॉ. रवींद्र आंधळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:50 PM2019-06-16T13:50:31+5:302019-06-16T13:50:39+5:30
भाऊसाहेब येवले राहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. ...
भाऊसाहेब येवले
राहुरी : शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. मान्सूनचे अद्याप राज्यातच आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागातील तज्ज्ञ डॉ. रवींद्र आंधळे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद!
प्रश्न : मान्सूनचा सध्याचा प्रवास?
डॉ. आंधळे : यंदा अहमदनगर जिल्ह्यात पावसाने बे्रक दिल्याचे चित्र समोर आले आहे़ येत्या चार दिवसात तुरळक स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे़ वायू वादळाने मान्सूनची प्रगती थांबली आहे. कर्नाटकापर्यंत पाऊस आला आहे.
प्रश्न : कधी येईल पाऊस?
डॉ. आंधळे : येत्या चार दिवसात नगर जिल्ह्यात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन मिलीमीटर पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे़ ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे़ पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या ठप्प झाल्या आहेत़ येत्या आठ दिवसात तरी समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़
प्रश्न : शेतीत सध्याचे काय चित्र आहे.
डॉ. आंधळे : शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागती केल्या आहेत़ बियाणेही खरेदी केले आहे़ मात्र पाऊस नसल्याने पेरणी करायची कशी? असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे़ काही शेतकºयांनी हलक्या पावसावर कपाशीची लागवड केली़ मात्र विजेचा लपंडाव व पाण्याची टंचाई यामुळे कपाशीची लागवड वाया गेली आहे़ कृषी सेवा केंद्र चालकांनी पुरेशा प्रमाणावर बियाणे खरेदी केले आहे़ मात्र बियाणाला उठाव नसल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात आले़
प्रश्न : शेतकरी राजाची अवस्था काय आहे?
डॉ. आंधळे : अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी २९४ मिली पावसाची नोंद झाली होती़ जिल्ह्यात गेल्यावर्षी केवळ ४४ टक्के पाऊस पडल्याने शेतीचे डोलारा कोसळला़ शेतकºयांवर कर्जाचा भार वाढला. तर दुसºया बाजूला सहकारी सोसायट्या व बँका धोक्यात आल्या आहेत़ गेल्या वर्षी जूनच्या सुरूवातीला पाऊस पडला़ त्यानंतर पावसाने
दडी मारली होती़ त्यामुळे
गेल्यावर्षी खरीप हंगाम वाया गेला होता़ यंदा शेतकºयांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे़ त्यामुळे शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़
प्रश्न : पेरण्या कधी कराव्यात.
डॉ. आंधळे : समाधानकारक पावसासाठी आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ येत्या चार दिवसात समाधानकारक पावसाची शक्यता नाही़ दोन-चार मिलीमीटर पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो़ जून अखेरपर्यंत पेरण्या करणे शक्य आहे़ उशिरा पेरण्या करण्याचे ठरले तर उशिरा येणाºया वाणाची पेरणी करावी लागेल़