इथून पुढे व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:35+5:302021-06-11T04:14:35+5:30
नगराध्यक्षा तांबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा धोका मोठा असू शकतो. अशी ...
नगराध्यक्षा तांबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा धोका मोठा असू शकतो. अशी शक्यता वर्तविली जाते आहे. कोरोनाचे संकट संपलेले नाही. नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे. कोरोनाला रोखण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात चांगले काम झाले. शासनाला केलेल्या आवाहनाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर होती. यात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली. अनेकांचा जीव गेला. काही शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट या पेक्षाही अधिक वेगाने वाढू शकते. तिसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग हा दुसऱ्याला लाटेपेक्षा चारपटींनी अधिक असू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्याने अनेक भागांमध्ये गर्दी होताना दिसते आहे. हे चुकीचे आहे. विनाकारण घराबाहेर पडणे, बाहेर फिरणे तसेच घरगुती समारंभ टाळावे. कोणत्याही आजारांची लक्षणे आढळून आल्यास तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. आपण काळजी घेतली तरच आपले कुटुंब सुरक्षित राहील. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.