‘त्या’ पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार नाभिक संघटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:23+5:302021-05-28T04:17:23+5:30
कोरोना महामारीत नाभिक समाजातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, तर अनेक ठिकाणी घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने ते कुटुंब उघड्यावर पडले. ...
कोरोना महामारीत नाभिक समाजातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, तर अनेक ठिकाणी घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने ते कुटुंब उघड्यावर पडले. नाभिक समाज हा तसा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून आधीच लॉकडाऊनमुळे समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी नाभिक समाजातील कर्त्या व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतलेला आहे. अशा कुटुंबातील पाल्यांचा पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाचा खर्च पेलण्याचा निर्धार नाभिक युवक संघटनेने घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष पवळे यांनी सांगितले. यासाठी संबंधित पाल्य अथवा त्यांच्या नातेवाइकांनी पाल्याची सर्व माहिती, पालकांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा पुरावा, शाळा, इयत्ता आदीची माहिती संघटनेचे पदाधिकारी श्रीपाद वाघमारे आणि युवराज राऊत यांच्याकडे पाठवावे, असे आवाहन पवळे यांनी केले आहे. सकल नाभिक समाजकडून एक हात मदतीचा ही संकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.