सर्वच तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या शंभरीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:13+5:302021-06-16T04:28:13+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही सरासरी १००च्या वर आहे. त्यामुळे अद्याप तरी एकही तालुका कोरोनामुक्त ...

The number of active patients in all the talukas is over one hundred | सर्वच तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या शंभरीपार

सर्वच तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या शंभरीपार

अहमदनगर : जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही सरासरी १००च्या वर आहे. त्यामुळे अद्याप तरी एकही तालुका कोरोनामुक्त झाला नसल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक तालुक्यात रोज सरासरी ४५ ते ५० कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वात कमी रुग्ण नगर शहरात आढळून येत आहेत. भिंगार शहरातील रुग्णांची संख्याही आता कमी होत असून, हा परिसर लवकरच कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनचे निर्बंध उठविण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी असून, नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने यंत्रणेनेही हात टेकले आहेत. त्यामुळे तालुके कोरोनामुक्त होण्यास आणखी किती अवधी लागणार, याकडेही लक्ष लागले आहे.

----

नागरिकांनी सभा, समारंभ, लग्नसोहळे सध्या शक्यतो टाळावेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र अनलॉक झाल्यानंतर लोक गर्दी करीत आहेत. गर्दी होत असेल तर कारवाई करण्याच्या सूचना तालुका यंत्रणेला दिल्या आहेत. ग्रामीण भागात हिवरेबाजार पॅटर्नची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

-डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

---

तालुका सक्रिय रुग्ण

नगर शहर १२३

अकोले २८५

जामखेड २२९

कर्जत २३५

कोपरगाव २४४

नगर ग्रामीण ११४

नेवासा ३३१

पारनेर ३३६

पाथर्डी ३७१

राहाता १४२

राहुरी २४६

संगमनेर ३६८

शेवगाव २९१

श्रीगोंदा ३७९

श्रीरामपूर २२३

भिंगार १५

--------------

आतापर्यंत झालेल्या चाचण्या- १४,११,५०९

बाधित होण्याचे प्रमाण- ४.१० टक्के

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण- ९६.८१ टक्के

-------------

एकूण रुग्ण- २,६४,७१३

उपचार सुरू असलेले - ३९६८

एकूण मृत्यू- ४७६१

---------

मृत्युदर - १.३० टक्के

कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर - ३ तालुके

---

अनलॉकनंतर वाढले रुग्ण

अनलॉकनंतर ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. राहुरी तालुक्यात सलग तीन दिवस ५०च्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. नगर शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी रोज सरासरी १५ रुग्ण आढळून येत आहेत.

---------

Web Title: The number of active patients in all the talukas is over one hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.