सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:33+5:302021-04-20T04:22:33+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी बरे झालेल्या १९६८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ३२२९ ...

The number of active patients has crossed 21,000 | सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार पार

सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार पार

अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी बरे झालेल्या १९६८ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत ३२२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१ हजार १३६ इतकी झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर सोमवारी ३० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद नमूद करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०४९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९१६ आणि अँटिजेन चाचणीत १२६४ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर १७४, अकोले १३६, जामखेड २६, कर्जत ७७, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ५९, नेवासा २०, पारनेर ६८, पाथर्डी ३८, राहाता ६७, राहुरी १५, संगमनेर ५७, शेवगाव १३३, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट बोर्ड ९३, मिलिटरी हॉस्पिटल २३, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३१२, अकोले ३१, जामखेड ३, कर्जत १७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ५४, नेवासा ३१, पारनेर ६, पाथर्डी ८, राहाता ९१, राहुरी २३, संगमनेर १८५, शेवगाव ११, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर ५५, कॅंटोन्मेंट बोर्ड २८ आणि इतर जिल्हा ३४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज १२६४ जण बाधित आढळून आले. नगर २५६, अकोले ३२, जामखेड १६, कर्जत ११९, कोपरगाव १३१, नगर ग्रामीण १४२, नेवासा ६२, पारनेर ६१, पाथर्डी ४४, राहाता ४९, राहुरी ६६, संगमनेर ५४, शेवगाव ६९ श्रीगोंदा ९६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट बोर्ड ५ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

---------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या:१,१६,६१०

उपचार सुरू असलेले रूग्ण:२११३६

मृत्यू:१६१२

एकूण रुग्ण संख्या:१,३९,३५८

--

...या तालुक्यात शंभरपेक्षा अधिक रुग्णसंख्या

सोमवारी कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णसंख्येत नगर शहर, संगमनेर, नगर ग्रामीण, कर्जत, शेवगाव, राहाता या तालुक्यातील रुग्णसंख्या दोनशेपेक्षा अधिक आहे, तर अकोले, कोपरगाव, पारनेर, भिंगार, श्रीगोंदा, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी या तालुक्यातील रुग्णसंख्या शंभरपेक्षा अधिक आढळून आली आहे.

Web Title: The number of active patients has crossed 21,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.