पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटली, कमी पाऊस पडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:49 PM2018-06-17T16:49:00+5:302018-06-17T16:49:27+5:30
जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़
राहुरी : जुनचा पहिला पंधरवाडा संपला असतांना झाडांवर पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे़ वाढत्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे आले आहेत़यंदा पावसाचे प्रमाणही मध्य राहील असा आंदाज अभ्यासक बापुसाहेब झडे यांनी व्यक्त केला आहे़
१५ मे ते १५ जुन यादरम्यान पक्षी विविध प्रकारच्या झाडांवर घरटे बांधतात़ यंदा मात्र पक्ष्यांनी कमी प्रमाणावर घरटे बांधल्याचे आढळून आले आहे़ कडुनिंब, बाभुळ, बोर, जांभुळ, आंबा, वड, पिंपळ आदी झाडांवर पक्ष्यांनी घरटे बांधले आहेत.तुरळक ठिकाणी झाडांवर पक्षी घरटे बांधत आहेत़ त्यामध्ये चिमणी, गवळणी, होला, साळुंकी आदी पक्ष्यांनी झाडांवर घरटे तयार केले आहेत़ यंदा झाडांवर दक्षिण व पश्चिम बाजुला पक्ष्यांनी घरटे बांधलेले आहेत़ झाडाच्या मध्यावर थोडेसे वरती घरटे आढळून आलेले आहेत़ त्यामुळे यंदा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पक्ष्यांनी झाडावर वरच्या बाजुला घरटे बांधल्यास कमी पावसाचा आंदाज व्यक्त होतो़ मध्यावर घरटे बांधल्यास भरपुर पाऊस पडतो़
गेल्या दहा वर्षापासून त्यांचा अंदाज खरा ठरला आहे़ गेल्या वर्षी पक्ष्यांनी झाडाच्या मध्यावर घरटे बांधली होती़ त्यावेळी समाधानकारक पाऊस पडण्याचा आंदाज व्यक्त केला होता़ यंदा गेल्या गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी पाऊस पडेल. बापुसाहेब झडे हे गेल्या दहा वर्षापासून पक्ष्यांची घरटे व त्यावर आधारीत पावसाचा अंदाज व्यक्त करतात़
पावशा हा पक्षी पेरत व्हा असा संदेश पावसाळ््याच्या तोंडी देतो़ मोरही पावसाचे संदेश देतो़ पक्ष्यांना निसर्गाच्या लहरींची जाणीव होते़ पशु-पक्ष्यांना संकटाची चाहुल लागते़ यंदा पक्ष्यांच्या घरट्यांंची बांधणी लक्षात घेता गेल्या वर्षाच्या तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. - बापुसाहेब झडे, अभ्यासक, राहुरी