कोरोना रुग्णांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:35+5:302021-05-21T04:22:35+5:30

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८८ आणि अँटिजेन चाचणीत १३२८ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा ...

The number of corona patients decreased | कोरोना रुग्णांची संख्या घटली

कोरोना रुग्णांची संख्या घटली

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २२१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०८८ आणि अँटिजेन चाचणीत १३२८ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर २२, अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ६०, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ६०, पारनेर ०२, पाथर्डी ०१, राहता ०३, राहुरी १९, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०३, कॅंटोन्मेंट १३ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १२०, अकोले २३, जामखेड ८१, कर्जत १०, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ७१, नेवासा ७१, पारनेर ९३, पाथर्डी ७४, राहाता ६७, राहुरी ३६, संगमनेर ९९, शेवगाव १५५, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ११७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा २१ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज १३२८ जण बाधित आढळून आले, नगर २१, अकोले ५८, जामखेड ४७, कर्जत ४८, कोपरगाव ६९, नगर ग्रामीण ५३, नेवासा ८०, पारनेर १३६, पाथर्डी १०१, राहाता ६५, राहुरी ६७, संगमनेर १७३, शेवगाव ६०, श्रीगोंदा २७४, श्रीरामपूर ६५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३७ टक्के इतके झाले आहे.

------

३२ जणांचा मृत्यू

२४ तासात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. सदरचे मृत्यू दोन-तीन दिवसांतील असून, त्याची पोर्टलवर एकाच दिवशी नोंद झाल्याचे यंत्रणेने सांगितले.

----

बरे झालेली रुग्णसंख्या : २,२१,१३७

उपचार सुरू असलेले रुग्ण : १८,६०५

मृत्यू : २,५७५

एकूण रुग्णसंख्या : २,४२,३१७

Web Title: The number of corona patients decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.