जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तिनशेपार, नगर शहरात व श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 08:44 PM2020-06-21T20:44:35+5:302020-06-21T20:44:55+5:30

अहमदनगर: सकाळी बारा रुग्ण आढळले असताना सायंकाळी पुन्हा सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी १८ रुग्ण आढळून आले आहेत. 

The number of corona patients in the district is three hundred each, in the city and three in Shrigonda taluka | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तिनशेपार, नगर शहरात व श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी तीन रुग्ण

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तिनशेपार, नगर शहरात व श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी तीन रुग्ण

अहमदनगर: सकाळी बारा रुग्ण आढळले असताना सायंकाळी पुन्हा सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे एकाच दिवशी १८ रुग्ण आढळून आले आहेत. 
नगर शहरातील  तोफखाना भागातील ६२ वर्षीय महिला, सिद्धार्थनगर भागातील ३५ वर्षीय पुरुष आणि सावेडी उपनगरातील रासने नगर येथील ६२ वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे.

श्रीगोंदा शहरातील १८ वर्षीय युवक आणि ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील ३७ वर्षीय महिलाही बाधित झाली आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. सध्या जिल्ह्यातील ४५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या तिनशेपार झाली आहे. 

जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्णसंख्या: ३०२

Web Title: The number of corona patients in the district is three hundred each, in the city and three in Shrigonda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.