कोरोनाची रुग्णसंख्या दीड हजारापर्यंत घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:26+5:302021-05-28T04:17:26+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दीड हजारापर्यंत कमी झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रथमच इतकी कमी रुग्णसंख्या आल्याने ...

The number of corona patients dropped to one and a half thousand | कोरोनाची रुग्णसंख्या दीड हजारापर्यंत घटली

कोरोनाची रुग्णसंख्या दीड हजारापर्यंत घटली

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या दीड हजारापर्यंत कमी झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत प्रथमच इतकी कमी रुग्णसंख्या आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी १,६१० इतके पॉझिटिव्ह आले, तर २,५७२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. नगर शहरात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२ हजार ८०५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २०१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३८ आणि अँटिजन चाचणीत ६७१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (११२), राहाता (८६), संगमनेर (१२७), श्रीरामपूर (९५), नेवासा (१८७), नगर तालुका (९०), पाथर्डी (८६), अकोले (१२२), कोपरगाव (१२३), कर्जत (७१), पारनेर (९०), राहुरी (१२६), भिंगार (३), शेवगाव (१२३), जामखेड (८२), श्रीगोंदा (७३), इतर जिल्हा (१४) येथील रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरातील रुग्णसंख्या चार दिवसांच्या तुलनेत गुरुवारी पुन्हा वाढली, तर नेवासा तालुक्यात सर्वाधिक १८७ रुग्ण आढळून आले आहेत.

-------------

कोरोनास्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : २,४०,९५०

उपचार सुरू असलेले रुग्ण : १२,८०५

मृत्यू : ३,०३२

एकूण रुग्ण संख्या : २,५६,७८७

----------

एकूण मृत्यू तीन हजार पार

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या गुरुवारी तीन हजारांच्या पुढे गेली. आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजार ३२ इतके मृत्यू झाले आहेत. गुरुवारी एकाच दिवसात ६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत असली तरी दरदिवशी सरासरी २० ते २५ जणांचा मृत्यू होत असल्याचे दिसत आहे.

---------

Web Title: The number of corona patients dropped to one and a half thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.