केडगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:21 AM2021-04-28T04:21:43+5:302021-04-28T04:21:43+5:30

योगेश गुंड केडगाव : कोरोनाचा दुसरा टप्पा केडगावकरांसाठी खूपच चिंताजनक व धोकादायक स्थितीत गेला. फक्त तीन महिन्यांतच केडगावमधील रुग्णांची ...

Number of corona patients halved in Kedgaon! | केडगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने घटली!

केडगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या निम्म्याने घटली!

योगेश गुंड

केडगाव : कोरोनाचा दुसरा टप्पा केडगावकरांसाठी खूपच चिंताजनक व धोकादायक स्थितीत गेला. फक्त तीन महिन्यांतच केडगावमधील रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली; मात्र केडगावकरांनी न घाबरता योग्य उपचार घेत कोरोनावर मात केली असून, सुमारे दीड हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असलेली रुग्णसंख्याही निम्म्याने घटल्याने केडगावकरांना दिलासा मिळाला आहे.

केडगावमध्ये आतापर्यंत चार हजार जणांना कोरोनाची लागण झाली; मात्र फेब्रुवारीपासून सुरू झालेला कोरोनाचा दुसरा टप्पा केडगावकरांसाठी मोठी चिंता वाढवणारा ठरला. फक्त तीन महिन्यातच केडगावमधील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या घरात गेली. रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या वाढत असल्याने केडगावमधील शाहू नगर, सुवर्णा नगर, जुने गावठाण, नवीन गावठाण, देवी मंदिर परिसरातील काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. यातील जुने व नवीन गावठाण अजूनही प्रतिबंधित क्षेत्र आहे.

केडगावमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनपाने केडगावमधील सर्व भाजीबाजार व सार्वजनिक ठिकाणे बंद केली. केडगाव आरोग्य केंद्राच्यावतीने केडगावमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली; तसेच केंद्रात रोज २५० तपासण्या सुरू करण्यात आल्या. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले. लसीकरणालाही वेग आल्याने आतापर्यंत ७ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले.

रोजच्या २५० चाचण्यांपैकी सरासरी ७० च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून येत होती. यानंतर मनपा व आरोग्य केंद्र, आशा सेविका यांच्यामार्फत बाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. यामुळे आता रोजच्या २५o तपासण्यांमधून फक्त २५ ते ३० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या आठवडाभरापासून रोजची ७o रुग्णसंख्या आता २५ वर आली आहे, तसेच केडगावमध्ये शिवसेनेच्यावतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले. तेथे जवळपास ५o रुग्ण उपचार घेत आहेत. केडगावमधील बॉस्को ग्रामीण केंद्रातही ६o रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या तीन महिन्यात केडगावमध्ये १ हजार ८८९ इतके रुग्ण आढळून आले असून यातील १ हजार ५१o रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ३७९ सक्रिय रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे.

................

केडगावची सद्यस्थिती

गेल्या तीन महिन्यातील रुग्ण - १८८९

बरे झाले - १५१०

सक्रिय रुग्ण - ३७९

लसीकरण पूर्ण - ७०००

आठवडापूर्वी रोजची रुग्ण संख्या - ७० ( सरासरी )

सध्याची रोजची रुग्णसंख्या - २५ ( सरासरी )

........................

केडगावमधील रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत आहे. बाधित रुग्णांचे अहवाल येताच त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. यामुळे साखळी तुटण्यास मदत होत आहे. सध्या रोजची रुग्णसंख्या निम्म्यापेक्षा कमी होत आहे.

- डॉ. गिरीश दळवी, आरोग्य अधिकारी, केडगाव आरोग्य केंद्र.

Web Title: Number of corona patients halved in Kedgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.