कोपरगाव तालुक्याचा कोरोना रुग्णाचा आकडा एक हजार पार; आज नवे ३४ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:28 IST2020-09-05T15:27:47+5:302020-09-05T15:28:29+5:30
कोपरगावात शनिवारी (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे १०१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३ जणांचे अहवाल बाधित तर ६८ निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती बाधित आले आहे. तालुक्यातील बधितांचा आकडा १००४ वर पोहोचला आहे.

कोपरगाव तालुक्याचा कोरोना रुग्णाचा आकडा एक हजार पार; आज नवे ३४ रुग्ण आढळले
कोपरगाव : कोपरगावात शनिवारी (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे १०१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३३ जणांचे अहवाल बाधित तर ६८ निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती बाधित आले आहे. तालुक्यातील बधितांचा आकडा १००४ वर पोहोचला आहे.
१७ व्यक्तींचे स्त्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. १८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
५ सप्टेबर अखेर १००४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १७८ बाधीत व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहे. उर्वरित ८०८ बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील ४ हजार ५६५ व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १००३ व्यक्तीची नगर येथे तर ३ हजार ५६२ व्यक्तींची रॅपिड अँॅटिजेन किटद्वारे तपासणी केली आहे.