जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाचशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:29 PM2020-07-02T12:29:20+5:302020-07-02T12:29:29+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्याुमळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता पाचशे झाली आहे. ३५ पैकी नगर शहरात २१ रुग्ण आढळून आले असून पाईपलाईन रोडवरील पद्मानगर परिसर लॉक करण्यात आला आहे.

The number of corona victims in the district is five hundred | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाचशे

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पाचशे

अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी ३५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्याुमळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता पाचशे झाली आहे. ३५ पैकी नगर शहरात २१ रुग्ण आढळून आले असून पाईपलाईन रोडवरील पद्मानगर परिसर लॉक करण्यात आला आहे.


बुधवारी सकाळी १०, तर दुपारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात नगर शहरात २१, अकोले-२, कोपरगाव-१, राहुरी-४, श्रीरामपूर-१, संगमनेर-१, पाथर्डी-१, राहाता-१ असे रुग्ण आढळून आले. अन्य एक बीड जिल्ह्यातील आहे.

नगर शहरातील तोफखाना भागात १०, ढवणवस्ती भागात २, केडगाव परिसरात ०१ आणि भूषणनगरमध्ये  ०१ रुग्ण आढळून आला आहे. सिद्धार्थ नगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. पाईपलाईन रोडवरील पदमानगरमध्ये ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षाचा युवक असे पाच जण बाधित आढळून आले आहेत. पद्मानगर येथील सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.
राहुरी तालुक्यातील केसापूर येथे ०३, वांबोरी येथे ०१ रुग्ण आढळला आहे. शिरुरकासार (जि. बीड) येथील एक व्यक्ती बाधित आढळला आहे. पाथर्डीमधील वामनभाऊनगर येथे एक बाधित रुग्ण, कोपरगाव येथील श्रीकृष्णनगर येथील ०१ आणि ओमनगर येथील ०२, शिर्डी (ता. राहाता) येथील ०१, आणि खैरे निमगाव (ता. श्रीरामपूर) येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव आढळून आला आहे.
अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ३५ वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे. हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
-----------
चालकाचा मृत्यू
अकोले तालुक्यात बुधवारी कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाला आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समितीजवळ राहणारा शहरातील नामवंत दुकानदाराच्या गाडीवर तो चालक होता. रविवारी पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या चालकाची मंगळवारी प्रकृती खालावली व त्याचा मृत्यू झाला. या युवकाची पत्नी, मुलगा व इतर जवळच्या संपर्कातील दोन असे एकुण सहा व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. 

Web Title: The number of corona victims in the district is five hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.