निष्काळजीपणामुळे वाढली ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:33+5:302021-05-23T04:20:33+5:30
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ...
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सीताराम राऊत, महेंद्र गोडगे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार जऱ्हाड, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अमृतवाहिनी संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
------------
कोरोनाचा स्टेंथ दिवसेंदिवस बदलतो आहे. नवा आजार हा अत्यंत घातक आहे; परंतु डबल मास्कचा वापर केल्याने आपण कोरोनापासून काही प्रमाणात स्वत:चा बचाव करू शकतो. काळजी घेणे हाच कोरोनापासून बचावासाठी मोठा उपाय आहे.
- डॉ. सुधीर तांबे, आमदार, नाशिक पदवीधर मतदारसंघ