साईनगरीत भाविकांची संख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:28+5:302021-02-27T04:27:28+5:30
१६ नोव्हेंबरला साई मंदिर सुरू झाले असले तरी भाविकांच्या संख्येवर नियंत्रण व दहा वर्षाखालील व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाकारण्यात ...
१६ नोव्हेंबरला साई मंदिर सुरू झाले असले तरी भाविकांच्या संख्येवर नियंत्रण व दहा वर्षाखालील व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे नेहमीच्या तुलनेत शिर्डीत भाविकांची संख्या कमी असली तरी थोड्याफार प्रमाणात व्यवहार सुरू झाले होते. बाजारपेठेत पुन्हा हालचाल जाणवू लागली होती. दरम्यान साईनगरीतील व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता रात्री नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे साई संस्थाननेही सकाळची काकड आरती व रात्रीची शेजारती भाविकांविना करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या दर्शनाची वेळ जवळपास दोन तासांनी कमी होऊन सध्या केवळ सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन सुरू आहे. त्यातच राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या अफवाही जोरात सुरू आहेत. यामुळे भाविकांचा ओघ एकदम कमी झाला आहे. आपण शिर्डीत दर्शनाला गेलो व लॉकडाऊन सुरू झाला तर अडकून पडू अशी भीती अनेकांना सतावते आहे. शिवाय गर्दीत कोरोनाचा संसर्ग होईल ही भीतीही कायम आहे. एकूणच शिर्डीतील भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
..................
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात व्यवसाय बऱ्याच प्रमाणात सुरळीत होण्याच्या मार्गावर होते. सध्या मिनी लॉकडाऊनने जवळपास ७० ते ८० टक्के भविकांची संख्या रोडावली आहे. एजंट नसलेली हॉटेल्स पूर्णपणे रिकामी आहेत.
- अशोक गंगवाल, व्यावसायिक