नेवाशातील ७० गावांची रुग्णसंख्या शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:21 AM2021-09-03T04:21:43+5:302021-09-03T04:21:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नेवासा : तालुक्यातील १३१ पैकी तब्बल सत्तर गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून शून्यावर असून ...

The number of patients in 70 villages in Nevasa is zero | नेवाशातील ७० गावांची रुग्णसंख्या शून्यावर

नेवाशातील ७० गावांची रुग्णसंख्या शून्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नेवासा : तालुक्यातील १३१ पैकी तब्बल सत्तर गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून शून्यावर असून तालुक्यातील तब्बल १ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये २६ हजार नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.

तालुक्यात मे महिन्यापर्यंत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊन ११८ पेक्षा जास्त गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र त्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून आला. मे अखेरीस तालुक्यातील अवघे १३ गावे कोरोनामुक्त होती. परंतु त्यानंतर रुग्ण संख्या घटल्याने तालुक्यातील तब्बल ७० गावे ऑगस्टअखेर कोरोनामुक्त झाले असून, ६१ गावांमध्ये अजूनही कोरोना आपले पाय रोवून बसला आहे.

ऑगस्ट महिनाअखेर सोनई व देडगावममधील पंचवीसहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. बेलपिंपळगाव, घोडेगाव, चांदा, तेलकुडगाव गावांसह नेवासा शहरात सरासरी दहा ते पंधरा रुग्ण उपचार घेत असून इतर ३१ गावांमध्ये बोटावर मोजण्याइतके रुग्ण आहेत.

तालुक्यातील कोरोनामुक्त झालेल्या ७० गावांप्रमाणे माका, राजेगाव, कांगोणी, नांदूरशिकारी, सौंदाळा, अंतरवली, वडुले, जेऊर हैबती, शहापूर, जैनपूर, पाचेगाव, नेवासा बुद्रूक, वाटापूर, अंमळनेर, सलबतपूर, गोगलगाव, शिरसगाव, खामगाव, गोपाळपूर, करजगाव, जळके खुर्द, उस्थळ दुमाला, बाभुळखेडा ही २३ गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असून या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण उपचार घेत आहेत.

मागील तीन महिन्यात तालुक्यात पाच हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या १५ हजार ५६ इतकी झाली आहे तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९६ टक्के असून १४ हजार ४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार तालुक्यातील ३१९ व्यक्तींनी कोरोनामुळे आपला प्राण गमावला आहे. सध्या २७२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

............................

नऊ आरोग्य केंद्रांत लसीकरण

तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण सुरू असून एक लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ८३६७३ नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. २५९०५ नागरिकांचे दोन्ही डोस असे १ लाख ९ हजार ५७८ डोस दिले गेले आहेत.

................

प्राथमिक आरोग्य केंद्र... एकूण ..... पहिला डोस..... दोन्ही डोस घेतलेले नागरिक

नेवासा : ९६१५ ....७४३१....२१८४

सलाबतपूर : ८१५८....६७८७....१३७१

नेवासा बुद्रूक : ९८१२....७७०७....२१०५

टोका : ९०३३....७१८१....१८५२

सोनई : १०४८०...८४३२....२०४८

चांदा : ९३३०....७३५२....१९७८

कुकाणा : १०४८६....७८६८...२६१८

शिरसगाव : ९४९७....७३८७....२११०

उस्थळ दुमाला : १०२६९....७८९५...२३७४

शनैश्वर ग्रामीण रुग्णालय : ५०९...३१०...१९९

ग्रामीण रुग्णालय घोडेगाव : ९०९१....६५१४....२५७७

ग्रामीण रुग्णालय नेवासा : १३२९८....८८०९....४४८९

............................

मागील काही महिन्यांच्या तुलनेत कोरोना रुग्ण संख्या घटत असून तालुक्यातील सत्तर गावे कोरोनामुक्त झालेली आहे तर तेवीस गावे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत. तरी तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्धतेनुसार नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.

-डॉ. अभिराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी, नेवासा

Web Title: The number of patients in 70 villages in Nevasa is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.