नगर शहरातील रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:59+5:302021-07-01T04:15:59+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९५ आणि अँटिजन चाचणीत १३८ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा ...
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९५ आणि अँटिजन चाचणीत १३८ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर १, अकोले १, जामखेड ४, नगर ग्रामीण १, नेवासा १, पारनेर २, पाथर्डी २, राहुरी १, संगमनेर १, शेवगाव १, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २, अकोले १, जामखेड ४, कर्जत ३, कोपरगाव १, नगर ग्रामीण ६, नेवासा ४, पारनेर १७, राहता १०, राहुरी ३, संगमनेर १८, शेवगाव ७, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज २३८ जण बाधित आढळून आले. नगर १, अकोले ४३, जामखेड १५, कर्जत १६, कोपरगाव ६, नगर ग्रामीण १३, नेवासा ४, पारनेर ३८, पाथर्डी ५१, राहाता ११, राहुरी ६, संगमनेर ३, शेवगाव १०, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ४ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
---------------
बरे झालेली रुग्णसंख्या : २,७१,८१७
उपचार सुरू असलेले रुग्ण : २,१४५
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५,८९२
एकूण रुग्णसंख्या : २,७९,८५४