चार तालुक्यांमध्ये रुग्णांची संख्या शंभरीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:20 AM2021-08-01T04:20:54+5:302021-08-01T04:20:54+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा एकाच दिवसात १०५० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि कर्जत ...
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी पुन्हा एकदा एकाच दिवसात १०५० कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि कर्जत या चार तालुक्यांत प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून आली आहे. नगर शहरात २५ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात प्रशासनाने थेट कारवाई सुरू केली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १०७, खासगी रुग्णालयात ५०१ आणि रॉपिड अन्टिजन चाचणी ४४२ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये संगमनेर (१५४), पारनेर (१३७), शेवगाव (१३२), कर्जत (१२६), जामखेड (९२), नगर ग्रामीण (५४), श्रीगोंदा (४९), अकोले (४८), नेवासा (३९), पाथर्डी (३८), राहाता (३७), राहुरी (३७), श्रीरामपूर (३३), कोपरगाव (३२), नगर शहर (२५), इतर जिल्हा (१५), भिंगार (२) येथील रुग्णांचा समावेश आहे.
--
राज्यात नगर जिल्हा आज दुसऱ्या क्रमांकावर
शनिवारी राज्यात जे रुग्ण आढळून आले त्यात अहमदनगर जिल्हा दोन क्रमांकावर आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ११८८, तर अहमदनगर जिल्ह्यात १०५० रुग्ण आढळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा (९९९) असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.