नगर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशेपार; आज नवे नऊ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:16 PM2020-06-06T16:16:41+5:302020-06-06T16:17:27+5:30
जिल्ह्यात शनिवारी नवे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. शनिवारी १४ कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १०९ झाली आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी नवे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. शनिवारी १४ कोरोनाचे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १०९ झाली आहे.
अहमदनगर शहरात तीन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष, कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली माळीवाडा येथील पंधरा वर्षीय मुलगा बाधित आढळून आला आहे.
चेंबूर (मुंबई) येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे आलेली ४० वर्षीय महिला आणि १८ वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. राहाता तालुक्यातील निमगाव कोºहाळे येथील ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यापूर्वी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
संगमनेर शहरातील ४० वर्षीय व्यक्ती बाधित झाली आहे. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूर (मुंबई) येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आलेला २७ वर्षीय युवक बाधित झाला आहे. कळवा ( जि. ठाणे) येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली ४५ वर्षीय व्यक्ती बाधित झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २०७ एवढी झाली असून १०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे ८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.