उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:40+5:302021-02-18T04:36:40+5:30
जिल्ह्यामध्ये विवाह सोहळे, अंत्यविधी, दशक्रिया विधी, राजकीय कार्यक्रम, सत्कार समारंभ, खरेदीसाठी बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे. सामाजिक ...
जिल्ह्यामध्ये विवाह सोहळे, अंत्यविधी, दशक्रिया विधी, राजकीय कार्यक्रम, सत्कार समारंभ, खरेदीसाठी बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वेस्थानकांवर गर्दी पहायला मिळत आहे. सामाजिक अंतर, सॉनिटायझर, मास्कचा वापर या नियमांचा सर्रास भंग होताना दिसतो आहे. मास्क वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शाळा-महाविद्यालये सुरू झाली असून, तिथे मात्र नियमांचे पालन केले जात आहे. भाजी खरेदीसाठी रोजच गर्दी पाहायला मिळते आहे. शिर्डी, शिंगणापूर, देवगड, मढी, मोहटा देवी आदी ठिकाणी भाविकांची गर्दी असून, मास्कचा वापर कमी झाला आहे. सामाजिक अंतर राखले जाईल, अशा कोणत्याही उपाययोजना प्रशासनाकडून आखल्या जात नाहीत, तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध केली जाणारी कारवाई थंडावली आहे.
------------
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अशी वाढली
२ फेब्रुवारी-९६३
७ फेब्रुवारी-१०६६
११ फेब्रुवारी-११०७
१२ फेब्रुवारी -११४१
१४ फेब्रुवारी-११६०
-----------
कोरोनाची सध्याची स्थिती
एकूण रुग्णसंख्या-७३ हजार ७०८
बरे झालेले-७१४९२
बरे होण्याचे प्रमाण-९७ टक्के
सध्या उपचार घेणारे-११००
मृत्यू-१११६
------
फोटो
जिल्हा परिषदेच्या स्मार्ट ग्राम पुरस्कारांचे मंगळवारी (दि. १६) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते वितरण झाले. यावेळी नगर शहरातील सावेडीमधील माउली संकुल सभागृहात मोठी गर्दी होती.