कोरोनाचे उपचार घेणाऱ्यांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:19+5:302021-01-08T05:03:19+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी ९९ रुग्ण आढळले, तर १४२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ...
अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी ९९ रुग्ण आढळले, तर १४२ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या प्रथमच एक हजाराच्या खाली आली असून, सध्या फक्त ९७८ जणांवरच उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६ आणि अँटिजेन चाचणीत १७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये महापालिका (२६), कोपरगाव (८), नगर ग्रामीण (९), नेवासा (३), पारनेर (३), पाथर्डी (११), संगमनेर (१७), शेवगाव (१), श्रीगोंदा (४), मिलिटरी हॉस्पिटल (१), अकोले (१), राहाता (५), श्रीरामपूर (२), परजिल्हा (६), जामखेड (२) येथील रुग्णांचा समावेश आहे.
--
पाच जणांचा मृत्यू
एकाच दिवसाच कोरोनाच्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १०४८ इतकी होती. ती संख्या सोमवारी १०५३ वर पोहोचली. त्यामुळे एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ गंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.