उपचार घेणाऱ्यांची संख्या सहा हजारांच्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:26 AM2021-08-20T04:26:22+5:302021-08-20T04:26:22+5:30
अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या सहा हजारांच्या वर गेली होती. ...
अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या सहा हजारांच्या वर गेली होती. गुरुवारी रुग्णसंख्या वाढली असली तरी उपचार घेणाऱ्यांची संख्या आता कमी झाली आहे. ही संख्या गुरुवारी ५,८९९ इतकी झाली आहे.
संगमनेरमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. गुरुवारी तब्बल २२७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्याखालोखाल श्रीगोंदा तालुक्यातही ११३ जण बाधित असून हा तालुका दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत ८३३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ८९९ इतकी झाली आहे. गुरुवारी ८४६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०२ हजार ४४० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०९ टक्के इतके झाले आहे.
गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८३ आणि अँटिजन चाचणीत २९४ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये संगमनेर (२२७), श्रीगोंदा (११३), पारनेर (९४), अकोले (५०), राहाता (४९), नगर ग्रामीण (४५), शेवगाव (४०), राहुरी (३३), कर्जत (२९), पाथर्डी (२९), नेवासा (२८), इतर जिल्हा (२४), कोपरगाव (२२), श्रीरामपूर (२१), नगर शहर (१५), जामखेड (११), भिंगार (२), मिलिटरी हॉस्पिटल (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
--
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : ३,०२,४४०
उपचार सुरू असलेले रूग्ण : ५,८९९
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६४२०
एकूण रूग्ण संख्या : ३,१४,७५९
---------
उपचार घेणारे रुग्ण
तारीख सक्रिय रुग्ण
१४ ऑगस्ट ५९४३
१५ ऑगस्ट ५९९८
१६ ऑगस्ट ६११७
१७ ऑगस्ट ६०५७
१८ ऑगस्ट ५९१८
१९ ऑगस्ट ५८९९
---------------