नगरमध्ये शिवभोजन थाळीसंख्येत दीडपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:55 PM2020-04-25T16:55:37+5:302020-04-25T16:56:57+5:30
त्या आता ४ हजार ७५० मिळणार आहेत. सध्याच्याच केंद्रचालकांना या थाळ्या वाढवून दिल्या आहेत.
अहमदनगर : राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने गरजूंच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिवथाळीचे उद्दिष्ट दीडपट वाढवले असून नगर जिल्ह्यात पूर्वी दैनंदिन ३ हजार ५०० थाळ्या मिळत होत्या. त्या आता ४ हजार ७५० मिळणार आहेत. सध्याच्याच केंद्रचालकांना या थाळ्या वाढवून दिल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना २८ मार्च ते २० एप्रिल या दरम्यान शिवभोजन थाळी वाटपाची संख्या ५ लाखांनी घटली आहे. यामुळे राज्य सरकारने हे घटलेले प्रमाण भरून काढण्यासाठी २३ एप्रिल ते २ मे या कालावधीत सुरू असणाऱ्या शिवभोजन थाळी वाटपात दीड पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे नगर जिल्ह्यात शुक्रवार (दि़२४) दररोज ४ हजार ७५० थाळ्या मिळणार आहेत.
गरीब लोकांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, म्हणून राज्य शासनाने १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली. परंतु कोरोनाच्या
काळात सध्या ती केवळ ५ रूपयांत मिळत आहे. काही केंद्रचालक तर हे ५ रुपयेही लाभार्थ्यांकडून घेत नाहीत. सध्या एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी केंद्रचालक जेवणाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवत
आहेत.
शहरात गुरूवारी झालेले थाळी वितरण
बळीराजा हॉटेल- २५३, हॉटेल दत्ता २०२, हमाल पंचायत २५०, हर्षवर्धन केटरिंग १५७, आवळा पॅलेस २०६, रेव्हेन्यू कँटिन २००, हॉटेल सद्गुरूकृपा १५७, सुवर्णम् प्राईड ३८६, हॉटेल वूड लॅण्ड, पारनेर ८७, कृष्णा भोजनालय ३६४, हॉटेल समर्थ, अकोले १२९, हॉटेल स्वामी समर्थ १८५, हॉटेल श्रीकृष्ण, कर्जत १५१, तिवारी हॉटेल १८७ आणि तृप्ती भोजनालय ७३.