भारतातील वातावरण संशोधनाला पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:24 AM2021-08-22T04:24:32+5:302021-08-22T04:24:32+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात संशोधनातील मोजमाप, नैतिक आणि बौद्धिक संपदा अधिकार या विषयावरील तीन दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारच्या ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात संशोधनातील मोजमाप, नैतिक आणि बौद्धिक संपदा अधिकार या विषयावरील तीन दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार उपस्थित होते.
संशोधन हे उत्पादनाशी निगडित करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सतत प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यूजीसीच्या अधिकृत प्रकाशनात, इम्पॅक्ट जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध होणे आवश्यक आहे. संशोधनातील संकल्पना शिक्षकांनी जाणीवपूर्वक आत्मसात कराव्यात. त्याचबरोबर संशोधकाची स्वतःची आचारसंहिता, शिस्त असावी. तसेच संशोधक हा नावीन्याचा शोध घेणारा असावा. संशोधनात एकता महत्त्वाची असते. भाषेची परिपक्वता समय सूचकता या गोष्टी महत्त्वाच्या असतात. संशोधनात केवळ औपचारिकता असू नये, तर स्वतःची खरी कल्पना, प्रयत्न, सूक्ष्म निरीक्षण, शुद्ध विचार या गोष्टीदेखील आवश्यक असतात, असेही डॉ. विद्यासागर म्हणाले.
वेबिनारचे आयोजन महाविद्यालयातील समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे व ग्रंथपाल डॉ. एस. बी. चव्हाण यांनी केले. डॉ. पंडित विद्यासागर यांचा परिचय प्रा. पिंगळे तसेच पहिल्या दिवशीचे प्रमुख वक्ते डॉ. राजेंद्र कुंभार यांचा परिचय प्रा. डॉ. एस. ए. आरोटे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. बी. व्ही. चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश्वरी ओझा यांनी केले. प्रा. अरुण लेले यांनी आभार मानले.