रस्ता सुरक्षेचे नियम पाळणे ही देखील एक समाजसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:44+5:302021-09-26T04:23:44+5:30
येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन ...
येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ‘रस्ता सुरक्षा विषयक सामाजिक जाणीव’ या विषयावर देवकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून रासेयो वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश निमसे यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अरुण पंदरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी केला. डॉ. सुनीता मोटे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. भगवान कुंभार यांनी केले.
-------
फोटो ओळी - २५एनएसएस
न्यू आर्ट्समध्ये राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिननिमित्त मोटार वाहन निरीक्षक धनंजय देवकर यांचा सत्कार करताना डॉ. अरुण पंदरकर. समवेत डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. मच्छिंद्र मालुंजकर आदी.