राधाकृष्ण विखे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:35 PM2019-10-05T13:35:09+5:302019-10-05T13:42:26+5:30
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी शनिवारी आक्षेप नोंदविला आहे़
अहमदनगर: शिर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या उमेदवारी अर्जावर सुरेश जगन्नाथ थोरात यांनी शनिवारी आक्षेप नोंदविला आहे़
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दाखल केलल्या अर्जाची शनिवारी छाननी करण्यात आली़ यावेळी संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील सुरेश जगन्नात थोरात यांनी लेखी आक्षेप घेतला आहे़ विखे यांनी ज्या व्यक्तीसमोर प्रतिज्ञापत्र केले आहे, त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्रावर शिक्का मारलेला आहे़ परंतु, त्याची मुदत कधी संपते, याचा उल्लेख नाही़ नोटरी करणाºया व्यक्तीची पाच वर्षासाठी नेमणूक असते़ मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरण करणे बंधनकारक असते़ याशिवाय प्रतिज्ञापत्रात आपण उमेदवारास व्यक्तीश: ओळखतो, असे नोटरी करणाºया व्यक्तीकडून देण्यात आलेले नाही़ तसेच ओळख म्हणून इतर व्यक्तींची स्वाक्षरी घेण्यात आलेले नाही, यासह अन्यही आक्षेप विखे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आले आहेत़