नियोजनाच्या अभावामुळे लसीकरणाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:38+5:302021-05-20T04:22:38+5:30
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात झावरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरुवातीपासून नियोजनबद्ध लसीकरण झाले असते तर ...
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात झावरे यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरुवातीपासून नियोजनबद्ध लसीकरण झाले असते तर ही परिस्थिती आज नसती. शासनाने सुरुवातीस ४५ वयोगटाच्या पुढील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या नियोजित दुसऱ्या लसीकरणाची तारीख येताच शासनाने पुन्हा निर्णय बदलून केवळ १८ ते ४४ वयोगटातीलच लसीकरण होईल, असे जाहीर केले. परिणामी ४५ वयोगटाच्या पुढील लोकांच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणास विलंब झाला. आता परत शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे थांबविले आहे व पुन्हा ४५ च्या पुढील वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्याचे ठरविले आहे. या बेजबाबदार धोरणामुळे नागरिकांचे हाल तर झालेच व दोन टप्प्याचे लसीकरण वेळेत पूर्ण न झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या ही वाढली. मी चालवीत असलेल्या स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या बहुतांशी रुग्णांना वेळवर लस मिळालेली नाही. सरकारच्या या धोरणामुळे आपण आजही इतर राज्यांच्या तुलनेमध्ये लसीकरण टप्प्यामध्ये पिछाडीवर आहोत. शासनाने आता तरी त्वरित जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करावे, अशी मागणी झावरे यांनी केली आहे.
-----
फोटो १९ सुजित झावरे