महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; आरोपीचा पुतळा जाळला
By अरुण वाघमोडे | Published: August 6, 2023 08:57 PM2023-08-06T20:57:51+5:302023-08-06T20:58:32+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपीच्या पुतळ्याचे दहन करत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपीच्या पुतळ्याचे दहन करत राष्ट्रवादीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केली. दरम्यान, जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला.
यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे, अभिजित खोसे, संजय चोपडा, बाळासाहेब बारस्कर, सुनील त्रिंबके, विपुल शेटिया, अजिंक्य बोरकर, संभाजी पवार, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, सागर गुंजाळ, मळू गाडळकर, बाळासाहेब जगताप, राम धोत्रे, सुमित कुलकर्णी, मंगेश खताळ, ऋषिकेश ताठे, सुरेश बनसोडे, मयूर कुलथे आदी उपस्थित होते. यावेळी आ. जगताप म्हणाले, देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी शहरातील काही अपप्रवृत्तीने बेताल वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे. महापुरुषांच्या विरोधात वारंवार बेताल वक्तव्य केले जात आहे. अशांवर शासनाने देशद्रोहाचा खटला दाखल करून कडक शासन करावे. याच्या पाठीमागील टीमचा शोध घ्यावा. महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या कुटुंबीयांवर देखील कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.