आमदार राजळे यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन

By Admin | Published: June 7, 2017 04:02 PM2017-06-07T16:02:52+5:302017-06-07T16:02:52+5:30

आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर सामूहिक जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

Before the office of MLA Rajale, Jagaran Goshlal movement | आमदार राजळे यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन

आमदार राजळे यांच्या कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन

आॅनलाईन लोकमत
शेवगाव, दि़७ - शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी बुधवारी शेवगाव तालुक्यातील भाकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, किसान सभा आदी संघटनांच्यावतीने आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर सामूहिक जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास ८ जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत जाहीर होणाऱ्या पुढील आंदोलनाच्या दिशेनुसार आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार या वेळी जाहीर करण्यात आला. शहरातील गाडगेबाबा चौकापासून घोषणा देत निघालेला हा मोर्चा आमदार राजळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांनी अडविल्यानंतर या ठिकाणी शासन व लोकप्रतिनिधींना जाग यावी, यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, कॉ. शशिकांत कुलकर्णी , कॉ. संजय नांगरे, कॉ. भगवान गायकवाड, आत्माराम देवढे, बापूराव राशिनकर, राम पोटफोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेवगाव शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे , सतिश मगर, बाळा वाघ, अशोक नजन, अविनाश देशमुख, नारायण पुंड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Before the office of MLA Rajale, Jagaran Goshlal movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.