पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी विसरले : श्रीगोंदा शहरात लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 01:15 PM2019-02-03T13:15:49+5:302019-02-03T13:16:09+5:30

श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही.

Officers forgot to close pipelines: Wasted millions of liters of water in Shrigonda city | पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी विसरले : श्रीगोंदा शहरात लाखो लिटर पाणी वाया

पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी विसरले : श्रीगोंदा शहरात लाखो लिटर पाणी वाया

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील काही भागातील नागरिकांना दोन दिवसापासून पाणी मिळाले नाही. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मेनरोड वरील जुन्या प्राथमिक शाळेजवळ रविवारी सकाळी सहा वाजता पाईपलाईनचा जोड निघाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते दत्ता जगताप यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष शुभांगी पोटे व नगरसेवक अशोक खेंडके यांना दिली. अशोक खेंडके तात्काळ घटनास्थळी आले. त्यानंतर तब्बल एक तासाने पाणी बंद झाले.
पालिकेने जुने पाईपलाईनचे कनेक्शन बंद करून नवीन पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था केली. दुस-या दिवशी नवीन नळाला पाणी येईल म्हणून पहाटेपासून नागरिक वाट पहात बसले. पण नवीन पाईपलाईन शेवटी बंद करण्याची गरज असते. मात्र पाईपलाईन बंद करण्याचे अधिकारी-कर्मचारी विसरून गेले. त्यामुळे सोडलेले पाणी नळाला न येता वाहून गेले.
या प्रकारासंदर्भात नगरपालिकेकडे तक्रार करुन संबधीत अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याकरिता ग्राहक पंचायतीकडे दाद मागणार असल्याचे दक्ष नागरिक फाऊंडेशनचे दत्ता जगताप यांनी सांगितले.

चौकशी करणार
सध्या पाईपलाईनचे काम चालू आहे. नवीन पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्याचे काम चालू आहे. पाईपलाईनचा जॉईन्ट निघाल्याने पाणी वाया गेले. याची चौकशी करुन ठेकेदाराला नोटीस देणार आहे. - शुभांगी पोटे, नगराध्यक्षा

 

Web Title: Officers forgot to close pipelines: Wasted millions of liters of water in Shrigonda city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.