देवा सरं ना ह्यो भोग कशा पायी...हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही लोणी परिसरातील बारा बलुतेदार अडचणीत: कोरोनाने जगणेच झाले ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:04 PM2020-04-14T12:04:50+5:302020-04-14T12:04:50+5:30

लोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.

 Oh my god, how did I get ... lost path, direction Twelve sandwiches in the dark yogurt butter area: Corona had to live 'lock' | देवा सरं ना ह्यो भोग कशा पायी...हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही लोणी परिसरातील बारा बलुतेदार अडचणीत: कोरोनाने जगणेच झाले ‘लॉक’

देवा सरं ना ह्यो भोग कशा पायी...हरवली वाट, दिशा अंधारल्या दाही लोणी परिसरातील बारा बलुतेदार अडचणीत: कोरोनाने जगणेच झाले ‘लॉक’


गणेश आहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : कोरोनामुळे जगणेच स्थिर झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेला शेतकरी आणखीनच घायाळ झाला आहे. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दूध व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनाने मृत्यू पावणाºया रुग्णांइतकेच दु:ख संगतीला घेऊन कसाबसा तग धरून आहे. असे विदारक चित्र राहाता तालुक्यातील दुष्काळी टापूत दिसते आहे. हे चित्र काळजाला वेदना देणारे आहे.
कोरोनाने उद्योगधंद्यासोबतच ग्रामीण भागातील अर्थकारणही कोलमडले आहे, हातावर पोट भरणाºया मजुरांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊन असल्याने उद्योगधंद्यांची चाके बंद पडली आहेत. या उद्योगांवर अवलंबून असणाºया मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहाता तालुक्यातही अनेक संस्थांनी १० ते ३० टक्के पगार दिले आहेत. तेथे काम करणारे मजूर घरीच बसून आहेत. तालुक्यातील सधन भागापेक्षा आडगांव, गोगलगाव, खडके,डोºहाळे, कोºहाळे, पिंपरी निर्मळ, केलवड आदी दुष्काळी भागातील परिस्थिती चिंताजनक आहे.
राहाता तालुक्यात स्थानिक नागरिकांबरोबर परप्रातांतून आलेले २०ते २५ हजार लोक हे विविध व्यवसायाच्या माध्यमातून पोट भरत होते. त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने खायचे काय?असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. भंगार विक्रीतून पोट भरणारे बेचैन आहेत. बारा बलुतेदारांचे जगणे विस्कळीत झाले आहे.
चौकट.....शेतकरी घायाळ
कोरोनाचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशवंत शेतीमाल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टरबूज पीक ांसाठी शेतकºयांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र सध्या ते बाजारपेठेत नेणे कठीण झाले आहे. हा माल मातीमोल भावात त्यांना विकावा लागत आहे. गोड मका, झेंडूची फुले, भाजीपाला जागेवरच कोमजला आहे. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे.
--------------------
जोडधंदा ही कोरोनाच्या कचाट्यात
शेतीबरोबर इतर जोडधंदा असावा म्हणून काही शेतकरी कुक्कुटपालन, दुग्धपालन करतात. मात्र कोरोनामुळे या जोडधंद्यांचेही कंबरडे मोडले आहे. दूध विक्री मंदावली आहे. दुधाचा दर पाच रुपयांनी कमी झाला आहे. शेतकºयांना जनावरे पोसणे कठीण जात आहे. अफवेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय आधीपासूनच अडचणीत आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
----------------
कोरोनामुळे नैसर्गिक संकट ओढवले आहे. शेतकºयांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. लाखो रुपयांचे कर्ज काढून बांधलेले पोल्ट्री फार्मचे कर्ज कसे फेडणार जनावरांना कसे पोसायचे? कष्टाने पीक पिकवूनही ते विक्री न करता फेकू न द्यावे लागते.
- विनायक चौधरी, पोल्ट्री व्यावसायिक, गोगलगाव, ता. राहाता
--------------------
गेल्या आठवड्यात ऐरणीवर हातोड्याचा घाव बसला नाही. त्यामुळे खोपट्यात चूल पेटली नाही. मुलांना पाण्यात पीठ घालून जगवतो आहे. सरकारचा एक छदामही मिळालेला नाही. रेशन दुकानात जाण्यासाठी कार्ड नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणीच वाली नाही.
-बाजीराव साळुंके, लोहार व्यावसायिक
---
दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला,त्यातच आता कोरोना मुळे जीव घायाळतीला आला आहे. उन्हाळ्यात पाण्याची चिंता करायची की जीवाची असा प्रश्न आहे. खरिपात जे पेरले ते अतिवृष्टीने वाहून गेले. रब्बीला अवकाळीने झोडपून काढले. आता काय करणार?
शिवाजी रामराव शेळके,शेतकरी,आडगांव ता.राहाता,
---------------
फोटो- १३ लोणी लोहार
कोरोना संचारबंदीमुळे लोहार कामही थंडावले आहे. आठवड्यापासून ऐरणीवर घाव घातला नाही. त्यामुळे लोणी येथील बाजीराव सोळुंके यांच्यासमोर जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title:  Oh my god, how did I get ... lost path, direction Twelve sandwiches in the dark yogurt butter area: Corona had to live 'lock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.