रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये नागरे, अग्रवाल यांच्या तैलचित्रांचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:00+5:302021-03-04T04:38:00+5:30
कोपरगाव : तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचे जनक स्व. लहानुभाऊ विठोबा नागरे यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ...
कोपरगाव : तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीचे जनक स्व. लहानुभाऊ विठोबा नागरे यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये लहानुभाऊ नागरे व प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल यांच्या तैलचित्रांचे अनावरण मंगळवारी झाले. संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे व कोपरगावचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या हस्ते हे अनावरण केले.
यावेळी उद्योजक कांतीलाल अग्रवाल, संजय नागरे, मनोज अग्रवाल, आनंद दगडे यांनी दुर्गा तांबे व पद्माकांत कुदळे यांचे स्वागत केले. स्व. नागरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुर्गाताईंनी त्यांच्या व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांच्या स्मृतींना उजाळा दिला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे व स्व. नागरे यांच्यामधील ऋणानुबंधाचा मागोवा घेतला. पद्माकांत कुदळे यांनी स्व. नागरे यांच्या आठवणी सांगितल्या.
रेनबो स्कूलचे कार्यकारी संचालक आकाश नागरे यांनी आभार मानले. याप्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन दत्ता डोखे, कैलास ढमाले यांनी केले.
.......